मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात प्रहारचे कार्यकर्ते ताब्यात

वरुड / 3 ऑगस्ट : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यभरात आंदोलन सुरू असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर वरुड व मोर्शी तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रहारचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोर्शी मतदारसंघातील दौर्‍यानिमित्त प्रहारचे तालुका संपर्कप्रमुख अजय चौधरी, तालुकाध्यक्ष प्रवण कडू, विलास पांडगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शेतकरी कर्जमाफीची तारीख घोषित करण्याची मागणी करताना पोलिसांच्या रडारवर आले.
सदर आंदोलन वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरुड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. प्रहार पक्षाचे निरीक्षक आणि प्रवक्ते जितू दुधाने यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, पोलिसांचा वापर करून लोकशाही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button