सलग दुसर्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण
10 तोळा 4,900 रूपयांनी स्वस्त

-चांदी 1.18 लाख प्रति किलोवर
अमरावती / 25 जुलै : गेल्या काही दिवसांत उच्चांकी गाठलेल्या सोन्यानं आज निच्चांकी गाठली आहे. आज शुक्रवार, 25 जुलै रोजी सोनं आणि चांदीचे दर घसरले आहेत. 1 तोळ्यामागे 490 रूपयांची घसरण झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी आपल्याला 1,00,480 रूपये मोजावे लागतील. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92,100 इतकी आहे. 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 75,360 इतकी आहे. मात्र, चांदीचे दर 1 लाखांवरच आहे.
सोन्याच्या दरात आज घसरण झाली. 10 तोळं सोन्याच्या दरात 4,900 रूपयांची घसरण झाली आहे. 24 कॅरेट 10 तोळ्यासाठी 10,04,800 रूपये मोजावे लागणार आहे. तर, 22 कॅरेट 10 तोळं सोन्यासाठी 9,21,000 रूपये मोजावे लागतील. तर, 18 कॅरेट सोन्यासाठी 7,53,600 रूपये मोजावे लागतील. अमेरिकेने अलीकडेच जपान आणि फिलीपिन्ससोबत नवीन व्यापार करार केला आहे. यामुळे जागतिक बाजारात असलेला तणाव काहीसा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या (सोनं) ऐवजी धोकादायक पण अधिक नफा देणार्या गुंतवणुकींकडे (शेअर बाजार) वळू लागले आहेत. या ‘प्रॉफिट बुकिंग’मुळे सोन्याची मागणी थोडी कमी झाली आणि किंमतीत घसरण झाली.
भारतात सोन्याची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क आणि सरकारचे कर, डॉलर-रुपयाचे दर, देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यानुसार सोन्याचे दर ठरविले जातात. भारतामध्ये सोनं केवळ गुंतवणुकीचा पर्याय नसून, सण-उत्सव, विवाह आणि धार्मिक कार्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात झालेल्या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो.




