पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; 50 जवानांचा मृत्यू

इस्लामाबाद : बलुचिस्तानात गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानी सैन्यांकडून हल्ले सुरु आहेत. पाकिस्तानी सैन्यांच्या हल्यानंतर आता बलुचिस्तानच्या बलोच आर्मीने प्रतिहल्ला केला आहे. बलोच आर्मीने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 50 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच आयएसआयचे 9 एजेंट देखील मारले गेले आहेत. बलोच आर्मीच्या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बलोच आर्मीने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी मिलिट्री इंटेलीजन्स आणि आयएसआयच्या 9 एजंट मारले गेले आहेत. बलोच आर्मीचं 72 तास सुरु असलेल्या अनेक खनिज आणि गॅस टँकरला लक्ष्य केलं. या व्यतिरिक्त पाकिस्तानी सैन्याच्या 5 ड्रोनही नष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button