महाराष्ट्रात बॉम्बस्फोटांच्या धमक्यांनी खळबळ

मुंबई नागपूरसह अनेक शहरांतील न्यायालये आणि सरकारी कार्यालयांना धमकीचे मेल

मुंबई/26 नोव्हेंबर : 26 नोव्हेंबर हा दिवस मुंबईकरांसाठी कधीही न विसरता येणारा आहे. 2008 मध्ये याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. आज या घटनेला 18 वर्ष पूर्ण झाली आणि आजच्याच दिवशी महाराष्ट्र ातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयाला आज पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल आला आहे. या मेलमध्ये महापालिका कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. तसेच मु ंबईतील महालक्ष्मी, सायन आणि आचार्य मेट्रो स्थानकांवर खएऊ बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. 27 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवण्याची धमकीही देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत मु ंबईतील महापौर कार्यालयाला अनेकदा अशा प्रकारचे मेल आले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालय, इडए इमारत, मुंबई विमानतळ आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यालाही धमकी देण्यात आली. मु ंबईप्रमाणे नवी मु ंबई महापालिका, बेलापूर न्यायालय, सिडको आणि कोकण भवन या ठिकाणांना धमकीचे मेल मिळाले. खबरदारी म्हणून इमारती रिकाम्या करण्यात आल्या. पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयालाही नोव्हेंबर महिन्यात तीन वेळा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. 2, 23 आणि 26 नोव्हेंबर रोजी आलेल्या मेलमुळे न्यायालयातील कामकाज थांबवून परिसर रिकामा करण्यात आला. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पुण्यापाठोपाठ नाशिक आणि नागपूर जिल्हा न्यायालयालाही धमकीचा ई-मेल मिळाला. नाशिकच्या ईमेलमध्ये न्यायालयाचा सहावा मजला उडवून देण्याचा उल्लेख होता, तर नागपूर न्यायालयाला आलेल्या धमकीमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र, कोणतेही स्फोटक आढळले नाही. एकाच दिवशी राज्यातील अनेक शहरांना धमक्या मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे मेल नेमके कोणी पाठवले आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Back to top button