ट्रम्प यांचा भारतावर 25 टक्के पर्यंत टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव

14 देशांवर शुल्क वाढवण्याची तयारी

चीनवर सर्वाधिक 40% पर्यंत टॅरिफ

वॉशिंग्टन/25 नोव्हेंबर  -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतातून येणार्‍या वस्तूंवर 25% पर्यंत टॅरिफ लागू करू शकतात. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने भारतासह 14 देशांवर नवीन शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला आहे.यामध्ये चीनवर सर्वाधिक 40% आणि व्हिएतनामवर 35% पर्यंत टॅरिफ लावण्याची चर्चा आहे. भारतासह 7 देशांवर 25% पर्यंत टॅरिफ लावला जाऊ शकतो. बांगलादेश, युरोपीय संघ, जपान, स्वित्झर्लंड आणि सिंगापूरसाठी हा टॅरिफ 20% पर्यंत आहे. अमेरिकन प्रशासनाचा आरोप आहे की, हे देश गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करून त्या कमी किमतीत जगभर विकत आहेत. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचे नुकसान होत असून त्यांच्यासाठी स्पर्धा करणे कठीण झाले आहे.
सेक्शन 301 अंतर्गत तपासणीनंतर नवीन टॅरिफचा प्रस्ताव-अमेरिकेने आपल्या व्यापार कायद्यातील कलम 301 अंतर्गत इतर देशांच्या उत्पादन क्षेत्राची चौकशी केली. यात अतिरिक्त उत्पादनाचा अमेरिकन व्यवसायावर काय परिणाम होत आहे, हे पाहण्यात आले.याचचौकशीच्या आधारे ट्रम्प प्रशासनाने भारतासह 14 व्यापारी भागीदारांवर नवीन शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.अमेरिकेने सक्तीच्या मजुरीच्या प्रकरणातही जुलैमध्ये 60 व्यापारी भागीदारांवर 10% ते 12.5% पर्यंत अतिरिक्त शुल्क लागू केले होते. या चौकशीत हे देश त्यांच्या कंपन्यांमध्ये सक्तीची मजुरी रोखण्यासाठी कोणती पावले उचलत आहेत, हे पाहण्यात आले होते.

Back to top button