वरिष्ठ सहाय्यक ते सहाय्यक प्रशासन अधिकारी पदोन्नतीत अमरावती जिल्हा परिषद राज्यात प्रथम
पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने मानले प्रशासनाचे आभार

अमरावती / 22 नोव्हेंबर – दिनांक 5 नोव्हेंबर 2026 च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ सहाय्यक संवर्गातून थेट सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया अमरावती जिल्हा परिषदेने राज्यात सर्वप्रथम पूर्ण केली. या प्रक्रियेला प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, अमरावतीच्या वतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
पदोन्नती प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यम गांधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. श्रीराम कुलकर्णी, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. निलेश तालन व श्री. श्रीकांत मेश्राम तसेच वरिष्ठ सहाय्यक श्री. सुजित गावंडे यांचे संघटनेने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
आभार व व्यक्त करताना सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती अर्चना मानकर, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर घाटे, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. पंकज गुल्हाने, श्री. निलेश तालन, श्रीकांत मेश्राम, संजय राठी, विजय कविटकर, श्री. लीलाधर नांदे, श्री. गजानन इंगळे व श्री. विनोद बुटे तसेच वरिष्ठ सहाय्यक श्री. सुजित गावंडे व श्रीमती अपर्णा आत्राम उपस्थित होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. पंकज गुल्हाने यांनी पदोन्नत कर्मचार्यांचे अभिनंदन करून त्यांना नव्या पदाच्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.





