मधुरा धामणगावकरची तिरंदाजी स्पर्धेत पदकांची हैट्रिक
1 रजत व 2 कास्यपदकाची कमाई

वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकाविले
अमरावती/18 नोव्हेंबर – शिलाँग येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत अमरावतीच्या मधुरा धामणगावकरने दमदार कामगिरी करत 1 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवत तिने रौप्यपदक पटकावले, तर वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळवून अमरावतीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आणि जागतिक स्पर्धेत पदक जिंकलेल्या मधुराने राष्ट्रीय स्तरावरही आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.
मधुराने स्पर्धेच्या पात्रता फेरीत अचूक नेमबाजी करत दुसरे स्थान मिळवले. या कामगिरीच्या जोरावर तिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर कंपाउंड वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट खेळ करत कांस्यपदक मिळवले. एकाच स्पर्धेत तीन पदके जिंकण्याची तिची कामगिरी विशेष ठरली आहे. यंदा मधुराने जागतिक स्पर्धेच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, निवड चाचणीत पाचवे स्थान मिळाल्याने तिला आशियाई क्रीडा स्पर्धेसह जागतिक स्पर्धेच्या तिसर्या आणि चौथ्या टप्प्यातील भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. या अपयशाने खचून न जाता तिने राष्ट्रीय स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले. तिच्या या यशामुळे अमरावतीच्या तिरंदाजी क्षेत्रातील ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. दरम्यान, याच स्पर्धेत अमरावतीच्या कुमकुम मोहोळनेही चमकदार कामगिरी केली. कुमकुम मोहोड आणि मधुरा धामणगावकर या दोघींनी मिळून महाराष्ट्राच्या पदकसंख्येत 7 पदकांची भर घातली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करणार्या अमरावतीच्या या दोन्ही खेळाडूंमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
अमरावतीच्या तिरंदाजांची पदकांची लयलूट
अमरावतीच्या कुमकुम मोहोड आणि मधुरा धामणगावकर यांनी वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचावली. दोघींनी मिळून 7 पदके जिंकली. मधुराने 1 रौप्य आणि 2 कांस्यपदके पटकावली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या मधुराने निवड चाचणीतील अपयशानंतरही राष्ट्रीय स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. या यशामुळे अमरावतीच्या तिरंदाजी क्षेत्राची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे.