अकोला जिल्हा रुग्णालयात एक्सपायरी डेट संपलेलं सलाईन लावले

नातेवाईकांचा आरोप, कारवाईची मागणी

अकोला/18 नोव्हेंबर –अकोल्याच्या शासकीय रुग्णालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रेन स्ट्रोकच्या उपचारासाठी दाखल असलेल्या 55 वर्षीय रुग्णाला चक्क वर्षभरापूर्वीच एक्सपायर झालेलं सलाईन लावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सलाईनची एक्सपायरी तारीख पाहताच नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचा जीव डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेच्या भरवशावर असतो. मात्र, अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात समोर आलेल्या या प्रकारामुळं रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या विहीगाव येथील 55 वर्षीय सुरेश वाकोडे यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यानं उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज दुपारी त्यांची प्रकृती स्थिर असताना त्यांना लावण्यात आलेल्या सलाईनच्या बाटलीवरील एक्सपायरी तारीख नातेवाईकांच्या निदर्शनास आली. विशेष म्हणजे, या सलाईनची मुदत तब्बल वर्षभरापूर्वीच संपल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णाला एक्सपायर झालेलं सलाईन लावण्याचा हा प्रकार गंभीर असल्याचं सांगत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत रुग्णाचे नातेवाईक डीन यांना निवेदन देणार आहेत.शेतकर्‍यांना सरकारने हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत न दिल्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी नुकतेच समृद्धी महामार्गावर मोठे आंदोलन केले होते. दिवाळी संपल्यानंतरही सरकारने शेतकर्‍यांसाठी कोणतीच पावले न उचलल्याच्या निषेधार्थ नितीन देशमुख आता नव्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. शेतकर्‍यांना सोयाबीनचा पिक विमा लवकरात लवकर मिळावा आणि तूर पिकाची लवकरच पिक पाहणी करून तुर उत्पादक शेतकर्‍यांनाही पीक विम्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी ते आता नव्या आंदोलनाच्या तयारीत आहे. यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ठाकरे गटाच्या वतीने मोर्चे काढण्यात येतील. त्यानंतर अधिवेशन काळात किंवा अधिवेशन काळानंतर संपूर्ण विदर्भाचे एक मोठे आंदोलन शेतकर्‍यांसोबत घेत करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा काही दिवसातच समोर ठेवणार असल्याचं नितीन देशमुखांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारने शेतकर्‍यांना दिवाळी साजरी करण्यासाठी दिलेली 5 हजार रुपयांची अग्रीम रक्कम अद्यापपर्यंतही शेतकर्‍यांना मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. अकोला जिल्ह्यात दिवाळीत ही मदत न मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या 82000 असल्याचं त्यांनी प्रशासनाच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितलं.

Back to top button