अवैध गोवंशाची वाहतूक करणार्‍या तिघांना अटक

सहा बैलांची सुटका, वलगाव पोलिसांची कारवाई, 9 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

टाकरखेडा शंभू/11 नोव्हेंबर : वलगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध गोवंश वाहतुकीविरोधात कारवाई करत तीन चारचाकी वाहनांमधून निर्दयतेने वाहतूक करण्यात येणार्‍या सहा गोवंश बैलांची सुटका केली. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तीन वाहनांसह एकूण 9 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.45 ते रात्री 8.30 वाजेदरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली वलगाव पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी तीन वाहनांमधून प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा गोवंश बैलांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी टाटा एस वाहन क्रमांक एमएच 04 ईएल 0037 (किंमत 1 लाख 50 हजार रुपये), टाटा एस वाहन क्रमांक एमएच 27 एक्स 8306 (किंमत 2 लाख 50 हजार रुपये) आणि अशोक लेलँड वाहन क्रमांक एमएच 15 डीके 4229 (किंमत 2 लाख 50 हजार रुपये) अशी तीन वाहने जप्त केली. तसेच सहा बैलांची एकूण किंमत 2 लाख 80 हजार रुपये आहे. वाहनांची 6 लाख 50 हजार रुपये आणि बैलांची 2 लाख 80 हजार रुपये अशी एकूण 9 लाख 30 हजार रुपयांची जप्ती करण्यात आली.या प्रकरणात शेख रिझवान अब्दुल शहादत (वय 41), शोहेब खान अफसर खान (वय 24) आणि फारुख खान अफसर खान पठाण (वय 30) या तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वाहनांमध्ये बैलांना दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आले होते. त्यांच्या चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी सहाही बैलांची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या बैलांना दस्तूरनगर चौकातील गौरक्षण संस्थेत (नोंदणी क्रमांक 12) संरक्षण व देखभालीसाठी ठेवण्यात आले आहे. या पथकाने केली कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इशा खांडे (ब.नं. 1205), पोलीस अंमलदार पंकज येवले (499), सोमनाथ घोलप (697), अमरदीप सोळंके (678) आणि निशांत पंधरे (359) यांनी ही कारवाई केली

Back to top button