निवृत्त सरकारी कर्मचार्यांचीही आचारसंहितेच्या नियमांतून सुटका नाही!
निवडणूक आयोगाचे प्रचारासाठी नियमात बदल

नवी दिल्ली/10 नोव्हेंबर: कोणतीही निवडणूक म्हटली की शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना कोणताही राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी होता येत नाही. आचारसंहितेची अनेक बंधने त्यांच्यावर असतात. मात्र, निवृत्त कर्मचारी, अधिकार्यांबाबत तसे कोणतेही नियम नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता या नियमांमध्ये असे अधिकारी आणि कर्मचार्यांचाही समावेश केला आहे. देशातील उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीपासून आयोगाने हे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित राज्यातील निवडणूक अधिकार्यांना तसे आदेश दिले असून सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.





