सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षा 16 फेब्रुवारीपासून

संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई/6 नोव्हेंबर-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणार्‍या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार, दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांना 16 फेब्रुवारी 2027 पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीच्या परीक्षा 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027 या कालावधीत पार पडणार आहेत.

Back to top button