दिवाळीत सोन्याचे नाणे मोफत मिळणार
माधुरी ज्वेलर्सची ग्राहकांसाठी खास भेट योजना

अमरावती/4 नोव्हेंबर – दिवाळीच्या सणानिमित्त माधुरी ज्वेलर्सने ग्राहकांसाठी खास भेट योजना जाहीर केली आहे. 2500 ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचे दागिने खरेदी करणार्या ग्राहकांना 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे नाणे मोफत दिले जाणार आहे. संचालक महेश वर्मा, अनिता वर्मा यांनी ही योजना सुरू केली आहे. गेल्या 70 वर्षांपासून सराफा बाजारात विश्वास आणि शुद्धतेची ओळख निर्माण करणार्या या पेढीच्या योजनेला ग्राहकांचे लक्ष मिळत आहे. जुन्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासून त्यानुसार 100 टक्के किंमत देऊन नवीन दागिने खरेदी करण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. सर्व दागिने हॉलमार्कयुक्त असल्याने ग्राहकांना शुद्धतेची खात्री मिळते. चांदीची भांडी, पायातील जोडवे, बिछिया, कंदोरा आणि चावीचे कडे अशा विविध वस्तूंची मोठी निवड येथे आहे. सोन्याचे भाव वाढत असताना हलक्या वजनातील आकर्षक दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. राजकोट, कोलकाता, तुर्की आणि जळगाव पद्धतीतील नक्षीकामाचे दागिने येथे उपलब्ध आहेत. तसेच कमी व्याजदरात सोने तारण कर्जाची सुविधाही दिली जाते. तारण ठेवलेल्या सोन्याचा स्वतंत्र विमा उतरविण्यात येतो. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.





