दिल्लीत सलग दुसर्‍या दिवशी जेनझीचा एल्गार, शेकडो ताब्यात

नेहा बोराने बसमधील व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

नवी दिल्ली/11 ऑक्टोबर :  जंतरमंतर 2.0 मध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये आंदोलनाचे रणशिंग फुकण्यात आल्यानंतर पहिल्या दिवशी दिल्ली पोलिसांनी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या दडपशाहीला भिती न घालता सलग दुसर्‍या दिवशी दिल्लीमध्ये अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला. दिल्लीमध्ये आज सुद्धा शेकडोच्या संख्येने आंदोलकांना रस्त्यांवरून उचलून नेत छावण्यांमध्ये बंदिस्त करण्यात आलं. मात्र आंदोलकांनी सर्वत्र जिथे जागा मिळेल, ज्या ठिकाणी पकडलं जाईल त्याच ठिकाणी जंतरमंतर करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सलग दुसर्‍या दिवशी नेहा बोराने जंतरमंतरकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. नेहाने कॅनॉट प्लेसपर्यंत धावत जात जंतरमंतरच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला, मात्र रॅपिड क्शन फोर्सच्या जवानांनी तिला ताब्यात घेत पुन्हा एकदा बसमध्ये बसवलं. यानंतर नेहाने बसमधील व्हिडिओ शेअर केला.
नेहाने व्हिडिओ धावत्या त्यांनी या बसलाच तुरुंग बनवलं आहे. खिडक्यांना जाळ्या आहेत. या बसमध्ये चार लहान कोठड्या आहेत, ज्यांना कुलूप लावलं आहे. श्वास घ्यायलाही जागा नाही. जाळीच्या दुसर्‍या बाजूला काचा आहेत. सर्व पुरुष आंदोलकांना शिवीगाळ करण्यात आली. आई, बहीण, जात, धर्म त्यांना जे काही सुचेल त्यावरून शिवीगाळ केली. त्यांच्या गुप्तांगांवर लाथा मारण्यात आल्या. आठ-सहा जणींना चार वेगवेगळ्या बसेसमध्ये कोंबण्यात आले, त्यांनी तुरुंगासारखी रचना तयार केली आहे. अटकेच्या बसेसना, अटकेच्या आधीच, तुरुंगात बदलणे हाच दिल्ली पोलीस आणि सीआरपीचा संपूर्ण हेतू आहे का? अशी विचारणा नेहाने केली.
नेहाने पुढे सांगितले की, सीआरपीने आज ज्या क्रूरतेने आम्हाला ताब्यात घेतले, त्याचा काहीच अर्थ लागत नाही, देशातील सामान्य लोकांविरुद्ध युद्ध पुकारण्याशिवाय दुसरे काहीही करत नाहीत. एवढे सैन्य, एवढी पोलीसगिरी, एवढा हिंसाचार, आई आणि बहिणींवरील अत्याचार, जाती-संबंधित अत्याचार, का? फक्त तुम्हाला एकाला वाचवायचे आहे म्हणून? चोर, ज्ञानेश कुमार? वर्दीतील लोकांना आणखी किती दलाली करावी लागेल, ज्यांचं काम जनतेची सेवा करणं आहे, पण ज्ञानेश कुमारला वाचवण्यासाठी आणि आरएसएस-भाजपसाठीच्या दलाली करण्यामुळे वेळच मिळत नाही?

Back to top button