लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आढावा बैठक

राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांचे निर्देश

अमरावती /9 ऑक्टोबर– शहरात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आ. सुलभा खोडके यांनी 8 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) कार्यालयात अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील जलपुरवठा व्यवस्था आणि उपलब्ध जलसाठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आ.सुलभा खोडके यांनी नागरिकांना अफवांवर अजिबात विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. अमरावतीला पाणीपुरवठा करणार्‍या अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून शहरात कोणतीही दुष्काळसदृश परिस्थिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व भागांत नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकार्‍यांना दिले. उपलब्ध जलसाठ्याचे वर्षभरासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार खोडके यांनी दिल्या. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जलपुरवठा व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवून गरजेनुसार आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. शहरातील अर्जुन नगर, राहाटगाव, व्यंकटेश्वर, विंचू टेकडी, महेंद्र कॉलनी आणि सिद्धार्थ नगर या भागात नवीन पाईपलाईन व केबल कामांसाठी झालेल्या खोदकामामुळे पाणीपुरवठा बाधित होत आहे. आमदार खोडके यांनी या दुरुस्तीच्या कामांना गती देऊन प्रभावित भागांतील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे निर्देश दिले. अप्पर वर्धा धरणाची एकूण साठवण क्षमता 330 दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आहे. यातून अमरावती शहरासाठी 58 एमसीएम पाणी आरक्षित केले जाते, तर शहराची वार्षिक गरज 55 एमसीएम आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही कमतरता नसून केवळ योग्य नियोजनावर भर दिला जात आहे. या आढावा बैठकीस आमदार संजय खोडके, मजीप्राचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंकी, उपविभागीय अभियंता संजय लेवरकर, मनोज वाकेकर, सीवरेज प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुनील चव्हाण व जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजभोग उपस्थित होते.

Back to top button