विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचे राजकारण सुरू
मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

दिल्ली, मुंबई, पुण्याच्या आंदोलनावर मांडली भूमिका
मुंबई /6 ऑक्टोबर : राज्यात सध्या दोन आंदोलन सुरू आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आणि मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांचे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच आता विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि राज्यातील विविध मुद्द्यांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन विरोधक आपले राजकारण करत असल्याचे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आणि एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर भाष्य केले आहे. मंगळवारी (6 ऑक्टोबर) मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
प्रसार माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या सर्व संस्था कुचकामी आहेत हे रुजवण्याचे काम आहे. त्यानंतर ते सांगतील की संविधान तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. परंतु, संविधान हातात घेऊन संविधान विरोधी काम सुरू आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी दिल्लीत सुरू असलेल्या राहुल गांधींच्या आंदोलनावर भाष्य केले. तर, मुंबई पोलीस हे प्रोफेशनली आहेत, ते कुणावरही चुकीची कारवाई करत नाहीत. आदिवासीसमाजाच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, त्या मागण्या मी मान्य केल्यानंतर त्यांनी माझे अभिनंदन केले. नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी जल्लोष सुद्धा केला. मात्र, आपल्या लिडरशिपसाठी ह्या विद्यार्थ्यांचा वापर केला जातोय, असे म्हणत फडणवीसांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले.
तर, याचवेळी त्यांनी पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य करत एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनावर यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्टपणे म्हटले की, चझडउ च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना हटवणे हे राज्य सरकारच्या हातामध्ये नाही. राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाच्या शिफारसींवरुनच त्यांना हटवता येते, हे संविधानात लिहिलेले आहे, असे फडणवीसांनी सांगितले.
आम्हाला कुणालाही वाचवायचं नाही- पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरु असून विरोधकांनी या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. राज्य सरकारच्यावतीने एमपीएससीच्या अध्यक्षांवर कारवाईसाठी राज्यपालांकडे शिफारस करण्यात आल्यानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतरही राजकीय दृष्ट्या इगो निर्माण केला जात असल्याचे म्हटलं आहे. आम्हाला कुणाला वाचवायचं नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.





