बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्या

राज ठाकरे यांची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपवर हल्लाबोल

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली ‘गर्जना मोर्चा’
काँग्रेससह विविध संघटनांचाही सहभाग

मुंबई /4 ऑक्टोबर :  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली आज ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणातून डखठ प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत महाराष्ट्रातील आतापर्यंतची संपूर्ण डखठ प्रक्रिया रद्द करण्याची तसेच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दोन प्रमुख मागण्या मांडल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली संपूर्ण डखठ प्रक्रिया रद्द करावी आणि मतदान यंत्रांऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी त्यांची भूमिका होती. डखठ प्रक्रियेच्या कायदेशीरतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकारमधील माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी डखठ संदर्भात केलेल्या वक्तव्याचा दाखला देत ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत अशा प्रकारची प्रक्रिया केली जाऊ शकते, मात्र त्यासाठी सर्वसाधारणपणे कायद्यात तरतूद नसल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी डखठच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली डखठ प्रक्रिया पूर्णपणे मागे घेण्याची मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी 40 ते 60 लाख मतदार वाढल्याचा दावा करत त्यातून सत्ता मिळवण्यात आली आणि आता डखठ प्रक्रियेत दोन कोटी लोकांना यादीतून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. हे दोन कोटी लोक कोण होते, ते आपले मतदार होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. डखठ रद्द करण्याची मागणी सर्व राजकीय पक्षांकडून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मतदान यंत्रांऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करताना राज ठाकरे यांनी, बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल, असे म्हटले. त्यानंतर सत्ता कोणाचीही आली तरी ती योग्य मार्गाने निवडून आलेली असेल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सत्ताधारी कोणताही पक्ष असो, निवडणूक प्रक्रियेतील अशा प्रकारच्या बदलांचा परिणाम भविष्यात सर्वांवर होऊ शकतो, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. आज सत्ता एका पक्षाकडे आहे; उद्या दुसरा पक्ष सत्तेवर आल्यास तोही यापेक्षा अधिक प्रमाणात असेच प्रकार करू शकतो. त्यावेळी आंदोलन करून उपयोग होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.जे हिटलरबाबत झालं ते आपल्या देशात होऊ शकतं. हिटलरच्या पापात जे जे सहभागी होते त्यांना नंतर शोधून काढण्यात आलं. त्यांच्यावर खटले भरले, काहींना फासावर लटकवलं काहींना तुरुंगात सडवलं. आपल्या देशात तशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हे भाजप आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी लक्षात घ्यावं, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी गर्जना मोर्चात दिला.
हिटलर हुकूमशहा होता आणि तो कुणालाच घाबरत नव्हता. मात्र, अशी वेळी आली की त्याला स्वत:वरच गोळी झाडून घ्यावी लागली होती. त्याने नरसंहार केला होता, त्याने त्यावेळी सर्व यंत्रणा त्यांने ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, त्याच्यावर आत्महत्येची वेळी आली आणि त्याच्यानंतर त्याला मदत करणार्‍यांना काय काय भोगावे लागले, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचक इशारा दिला.
एकट्या महाराष्ट्रातून 2 कोटी तर देशातून तब्बल 13 कोटी मतदार वगळले आहेत. म्हणजेच महाराष्ट्राच्या लोकसंख्येएवढे मतदार वगळले आहेत. हे म्हणजे भारतीयांना मतदानाचा अधिकार नाकारण्याचा प्रकार आहे. नागरिकत्व काढून घेण्याचा अधिकार गृह मंत्रालयाला आहे. त्याचे मंत्री अमित शहा आहेत. ते अमित शहा निवडणूक आयोगाच्या मदतीने नागरिकत्व काढून घेत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचवेळी देशाच्या सीमा तुमच्या हातात आहेत. मग बांगलादेशी भारतात, महाराष्ट्रात येतोच कसा? असा सवाल करत एसआयआरमधून किती बांगलादेशी पकडले? असा प्रश्न उपस्थित केला. बांगलादेशींच्या नावाखाली आपल्या देशातील नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणार असाल तर नाईलाजाने आज पाऊल उचलले आहे उद्या हात उचलावा लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
‘आपण देशाचा ढाचा बदलत आहोत आणि तो कोसळून टाकत आहोत’, असे सांगत राज ठाकरे यांनी भविष्यातील पिढ्यांच्या भवितव्याचाही प्रश्न उपस्थित केला. कोणत्याही पद्धतीने सत्ता मिळवण्याची प्रवृत्ती देशासाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले. आजचा मोर्चा याच प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या मोर्चासाठी विविधराजकीय पक्षांचे नेते एका व्यासपीठावर आले होते. मात्र, सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी व्यासपीठावर नसल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले. उद्या सत्तांतर होऊन हेच पक्ष विरोधी बाकांवर गेले आणि नव्या सत्ताधार्‍यांनी यापेक्षा दुप्पट प्रमाणात असे निर्णय घेतले, तर त्या वेळी काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे एसआयआर प्रक्रिया आणि निवडणूक पद्धतीचा मुद्दा केवळ सध्याच्या सत्तेविरोधातील राजकीय संघर्ष न राहता देशाच्या लोकशाही व्यवस्थेच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

Back to top button