दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सहा वर्षांनी गुन्हा दाखल

आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख

राजकीय आणि मुंबई पोलीस दलात खळबळ
सीबीआयच्या एफआरआयमध्ये 33 जणांची नावे

मुंबईः/14 सप्टेंबर-दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने अखेर गुन्हा दाखल केला. गुन्हेगारी कट, सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि आरोपीला शिक्षा होण्यापासून वाचवण्यासाठी खोटी माहिती देणे, यासह इतर आरोप करण्यात आले आहेत. या एफआरआयमध्ये माजी उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, अभिनेता डिनो मोरिया यांच्यासह 33 पेक्षा अधिक लोकांची नावे आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आणि मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मयत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. या प्रकरणात न्यायालयाने सीबीआयला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला असून, यात माजी मुख्यमंत्री, माजी गृहमंत्री, पोलीस दलातील अनेक अधिकारी, डॉक्टर आणि फॉरेन्सिक लॅबमधील अधिकार्‍यांचीही नावे आहेत.
दिशा सालियन प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआरआयमध्ये सीबीआयने म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे वडील आणि इतरांनी देखील या कटात आणि त्यानंतर प्रकरण दाबण्याच्या कृत्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संबंधित सार्वजनिक सेवक आणि पोलीस अधिकारी देखील केसचे कागदपत्रे, फाईल्स आणिइतर सार्वजनिक नोंदी नष्ट करणे किंवा दडपून टाकणे, अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करणे आणि बेकायदेशीर कारणांसाठी व गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकारी पैशांचा, शासकीय मनुष्यबळ आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणे यासाठी तपासासाठी पात्र आहेत, असा गंभीर ठपका सीबीआयने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतरांवर ठेवला आहे.

Back to top button