सर्वोच्च न्यायालय सर्वांनी गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करतंय का?

अभिजीत दिपकेंचा सवाल

नवी दिल्ली /7 ; ऑगस्टतृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी सध्या राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांसमोर व्हर्च्युअल (ऑनलाइन) हजर राहण्याची मागणी करणार्‍या मोइत्रा यांना न्यायालयाने जोरदार दणका दिला. न्यायालयाने राजकारणात आल्यानंतर अंडी फेकण्याला कशाला घाबरता? आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी तर छातीवर गोळ्या झेलल्या होत्या अशी टिप्पणी करत मोइत्रांची याचिका फेटाळण्याचे संकेत दिले होते, ज्यानंतर मोइत्रा यांच्या वकिलांनी ती याचिका मागे घेतली.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या याच टिप्पणीवर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या टिप्पणीवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केले आहेत.
अभिजीत दिपके काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा रोख धरत अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी लिहिले आहे की, सर्वोच्च न्यायालय आता प्रत्येकाने गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करत आहे का? जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विरोधकांच्या नेत्यांविरोधात अशा प्रकारची वक्तव्ये करतात, तेव्हा सर्वसामान्य माणसासाठी काय आशा उरते? दिपके यांच्या या ट्विटमुळे न्यायालयाच्या भाषेवर आणि टिप्पणीच्या स्वरूपावर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button