अमरावती शहरात बिबट्याचा धुमाकूळ
राजुरा नाका परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड दहशत

दुचाकीस्वारावर अचानक बिबट्याचा जीवघेणा हल्ला
अमरावती /6 ऑगस्ट- शहराला लागून असलेल्या राजुरा नाका परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस धोकादायक ठरत चालला असून मंगळवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आपल्या आईसोबत शहराच्या दिशेने निघालेल्या एका युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला चढवला.
या सुदैवी घटनेत युवकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्या आईचे प्राण बालकिल्ल्याने वाचले आहेत. या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने पावले उचलून या परिसराला सुरक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बत्तीस वर्षीय निखिल संतोष गिर हे आपल्या आईला दुचाकीवर बसवून राजुरा नाका मार्गिें अमरावती शहराकडे जात होते. वाटेत अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झेप घेतली. या झटापटीत निखिल यांच्या पायाला मुक्का मार लागला परंतु त्यांची आई पूर्णपणे सुरक्षित राहिली. या धक्कदायक प्रकारानंतर तात्काळ फ्रेजरपुरा पोलिसांचे पथक आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पंचनामा करत परिसराची पाहणी सुरू केली आहे. यापूर्वी सुद्धा याच भागात घनश्याम घोगरकर आणि निलेश किसन पवार यांच्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार घडणार्या या घटनांमुळे राजुरा नाका आणि परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे. नागरिक आता घराबाहेर पडताना धडपडत असून वन विभागाच्या पथकाने तातडीने या बिबट्याला जेरेबंद करावे, अशी आक्रमक मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या वन विभागाची टीम बिबट्याच्या मा30वर असून नागरिकांना सतर्क राहण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. याआधीही शहराच्या सीमावर्ती भागात पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या असून दोन महिन्यांपूर्वी रामपूर कॅम्प एरियात बिबट्याचे पिल्लू आढळले होते.




