दिल्ली विश्वविद्यालयातून वैभव अभ्यंकरने केली एलएलबी पदवी संपादन

अमरावती/3 ऑगस्ट: अमरावतीच्या राहुल नगरमधील एका जिद्दी तरुणाने गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित साधनांवर मात करत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या नामांकित विद्यापीठातून विधी पदवी संपादन करून यशाचा झेंडा फडकवला आहे. अमरावतीचे सुपुत्र वैभव अभ्यंकर यांनी सन 2023 ते 2026 या तीन वर्षांच्या कालावधीत दिल्ली विद्यापीठातून विधी शाखेची पदवी अत्यंत चमकदार गुणांनी उत्तीर्ण केली. वैभव यांचा हा प्रवास केवळ अभ्यासापुरता मर्यादित नव्हता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवत त्यांनी दिल्लीत शिकत असताना सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींत हिरिरीने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या आंदोलनांत त्यांनी प्रत्यक्ष उतरून लढा दिला. एका सर्वसामान्य घरातील मुलाने स्वतःच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर थेट दिल्ली गाठून मिळवलेले हे यश संपूर्ण अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.त्यांच्या या यशाची बातमी शहरात पोहोचताच सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आजी गोकर्णाबाई वकीलराव अभ्यंकर, जिजा वसंतराव तसरे, वडील दादा अभ्यंकर, बाबाराव अभ्यंकर, आई वंदना दादा अभ्यंकर आणि वीणा अभ्यंकर यांनी वैभवचे औक्षण करून उज्वल भविष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले. तसेच परिसरातील वरिष्ठ अभियंता सुशील गुडदे, अभियंता संजय ढवळे, नितीन आठवले, सतीश गवई, कलेश कांबळे, राजेंद्र गवई, सिद्धार्थ गुडदे, विजय वानखडे, मोहन इंगळे, प्राध्यापिका अरुणा तसरे, रूपेश सरदार, देवेन ढोके, विजय दांडगे, पोलीस निरीक्षक राहुल तसरे, पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, अभियंता अनिल बागडे, अमोल अडेकार, विजय लव्हाळे, सचिन बनसोडे, सागर वानखडे, चेतन अभ्यंकर आणि मानवता बुद्ध विहार परिसरातील नागरिकांनी वैभव यांचे विशेष अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

Back to top button