हायकोर्टाने जाब विचारताच, मुंढे थेट कोर्टालाच भिडले

दोन कॅन्टीनवर एफडीएची कारवाई

मुंबई /30 जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं कारवाई संदर्भात प्रश्न विचारले होते. सरकारी आस्थापनांमधील उपहारगृहांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला प्रश्न विचारताच एफडीएचं पथक आज उच्च न्यायालयात दाखल झालं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहांची तपासणी एफडीएकडून सुरू करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाकडून केलेल्या तपासणी दरम्यान उच्च न्यायालयातील एका उपहारगृहाची नोंदणीच झाली नसल्याचं स्पष्ट झालं. नियमानुसार नोंदणी नसलेल्या उपहारगृहांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. अन्न व औषध प्रशासनानं मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरातील कँटिंनची तपासणी केल्यानं या कारवाईची चर्चा रंगली आहे. मुंबई हायकोर्टानं मंगळावरी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने खाजगी आस्थापनांवर कारवाईचा धडाका लावणार्‍या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच प्रश्चिन्ह उपस्थित केले होते. आजवर किती मंत्रांच्या आणि सरकारी आस्थापनांवर छापे टाकले अशी विचारणा करत मंत्रालयासह उच्च न्यायालय, सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचीही तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
कोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित करताच तुकाराम मुंढे काय म्हणाले?-तुकाराम मुंढे यांनीएफडीएच्या कार्यपद्धतीवर ज्याप्रकारे कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. एफडीएची कारवाई ही भारतात जो कायदा निर्माण झाला त्यानुसारच महाराष्ट्रात कारवाई होत असल्याचे म्हटलं. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी नगर मधील प्रयोग शाळेतील अधिकार्‍यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर जे प्रश्न उपस्थित केले आणि त्यांची तक्रार केली यावर तुकाराम मुंढेंनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
तुकाराम मुंढे यांची शाळांसाठी मोहीम- अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यातील शाळांसाठी एक मोहीम सुरु करण्यात आली आहे. राज्यातील शाळांमध्ये मिळणारा मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि कँटीनमधील आहार पूर्णपणे सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशनयुक्त असणं अपेक्षित आहे. यासाठी ’सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही मोहीम लागू करण्यात आली आहे. राज्यातील 1 लाखांहून अधिक शाळांमध्ये 2 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या गुणवत्तेचा आहार मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असं तुकाराम मुंढे यांनी काल पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात धडक कारवाया करत दूध भेसळ करणार्‍यांवर कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button