राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला याव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान

* ठाकरे बंधूंचा अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न

मुंबई /23 जुलै: महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडला. या घोटाळ्यात आयएएस अधिकार्‍यां पासून ते तत्कालीन मंत्र्यांपर्यंत अनेक जण सामील होते. यात पेपर लीक झालेच, शिवाय नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा पराक्रम ‘मविआ’ सरकारच्या काळात झाला, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील आंदोलन, संसदेतील वाद आणि ठाकरे बंधूंच्या आंदोलनाच्या इशार्‍याचा जोरदार समाचार घेतला. महाविकास आघाडीच्या काळात टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांची आठवण करून देत मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या सरकारने टीईटी परीक्षेत गैरव्यवहार होत असल्याचेलक्षात येताच परीक्षा होण्यापूर्वीच घोटाळेबाजांना अटक करून कठोर कारवाई केली. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात झालेला घोटाळा आणि भ्रष्टाचाराचा स्तर राज्याने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना खुले आव्हान देत मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्षांनी पळपुटेपणा सोडून संसदेतील चर्चेला सामोरे जावे.

संबंधित बातम्या

Back to top button