जंतर-मंतरवरील आंदोलनाचा आता देशभरात वणवा
कॉकरोच जनता पार्टीकडून देशव्यापी आंदोलनाची हाक

नवी दिल्ली/23 जुलै- कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्या आवाहनानंतर देशभरातील तरुणांनी 20 जुलै रोजी संसदेच्या दिशेने मोर्चा काढला होता. मात्र संसद भवनापर्यंत जाणारे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या होत्या. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने त्याच दिवशी रात्री जंतरमंतरवर येत पुन्हा आंदोलन करण्यास सुरुवात केली. आज (23 जुलै) जंतरमंतरवरील आंदोलनाचा 34 वा दिवस असून कॉक्रोच जनता पार्टीने 24 जुलै रोजी शांततापूर्ण निदर्शनांसाठी देशव्यापी आवाहन केले आहे. कॉक्रोच जनता पार्टीने द या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की,शांततापूर्ण निदर्शनांसाठी देशव्यापी आवाहन करण्यात येत आहे. 24 जुलै रोजी एकच मागणी प्रत्येक जिल्ह्यातून एकाच वेळी केली जाईल. संपूर्ण भारतातील पोलीस अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या समर्थनार्थ एकत्र उभे राहूया. यासाठी एकत्र या आणि संघटित व्हा. विद्यार्थी संघटना आणि इतर संस्थांनी परवानगी व नियोजनासाठी (लॉजिस्टिक्स) परस्पर सहकार्य करून एकत्र काम करावे. तसेच विद्यार्थी संघटना आणि इतर संस्थांनी उपस्थित जनसमुदायासमोर विद्यार्थ्यांच्या मागण्या मोठ्याने वाचून दाखवाव्यात आणि पोलीस अत्याचाराचा सामना करणार्यांप्रती आपला पाठिंबा दर्शवा. देशव्यापी निदर्शनासंबंधित सविस्तर कार्यपद्धती, प्रचार साहित्य आणि निवेदनाचे नमुने ुुु.लेलज्ञीेरलहक्षरपींररिीीूं.लेा/िीेींशीीीं-101 या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, अशी माहिती कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली जाणार आहेत, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल, असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले की, पेपरफुटीच्या प्रकरणांवर कारवाई करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा ‘जबाबदारी निश्चिती’च्या मुद्द्याला हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली आहे.




