वारकर्यांना ट्रकने चिरडलं, चार जणांचा मृत्यू
जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणार्या

पुणे/13 जुलै : पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीतमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. संत ज्ञानेेशर माऊलींच्या पालखीमध्ये
सहभागी झालेल्या वारकर्यांना भरधाव ट्रकने चिरडलं. जेजुरीतील महामार्गावर ही घटना घडली. या अपघातामध्ये 4 वारकर्यांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी वारकर्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे जेजुरीत एकच गोंधळ उडाला.मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरीमध्ये माऊलींच्या वारीत पायी जाणार्या वारकर्यांना भरधाव टॅकने जोरदार धडक दिली. पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ ही अपघाताची घटना घडली. ट्रकच्या धडकेत
6 वारकरी गंभीर जखमी झाले होते. यामधील 4 वारकर्यांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर दोन वारकर्यांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी वारकर्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.माऊलींची पालखीने आज सासवडवरून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. जेजुरीत दाखल झाल्यावर पालखीवर भंडार्याची उधळण केली जाते. अशातच हा अपघातझाला. वारीमधीलच ट्रक वारकर्यांच्या
गर्दीत घुसला. ट्रकने अनेक वारकर्यांना चिरडले. या अपघातामध्ये 4 वारकर्यांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि सर्वांची पळापळ झाली.




