राम मंदिरातील लुटीवर ’सर्वोच्च’ प्रहार

सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारसह योगी सरकारला नोटीस

एसआयटीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

आयोध्या/13 जुलै  :आयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिरासाठी मिळालेल्या देणगीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारला नोटिस बजावली आहे. या प्रकरणी स्वतंत्र तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणार्‍या याचिकांवर उत्तर मागवण्यात आले आहे. तसेच कोर्टाने एसआयटीकडून चौकशीचा
स्टेट्स रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत/ यासोबतच सीसीटीव्ही फुटेज देखील सेव्ह करून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला नोटिस देत राम मंदिराच्या देणगीतील कथित घोटाळा प्रकरणाचे उत्तर मागितले आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती वी. मोहना यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीकडून चौकशीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. कोर्टाने स्पष्ट केले की, उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने आपला स्टेटस रिपोर्ट सादर करावा. तसेच एसआयटीची स्थापना कशी करण्यात आली, याची माहितीही अहवालात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय राम मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍या श्री राम जन्मभूमी तीथ क्षेत्र ट्रस्टलाही या याचिकांवर उत्तर देण्यास सांगितले आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकांच्या गटावर सुनावणी घेतली. या याचिकांमध्ये अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला मिळालेल्या देणगी आणि दान व्यवस्थापनात कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button