अमरावतीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

विद्यार्थ्यांच्या यशावर कौतुकाची उधळण

आयटी पार्कसह औद्योगिक प्रगतीचे स्वप्न

युवा स्वाभिमान व भाजपचा संयुक्त उपक्रम

अमरावती/26 जून-शहरातील सांस्कृतिक भवनात युवा स्वाभिमान पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य गुणगौरव सोहळ्यात दहावी व बारावीच्या 8300 यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील सर्व स्तरातून विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांना शैक्षणिक बॅग, वह्या, पेन, पाण्याची बाटली आणि डबा यांसारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, मुलांच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या त्यांच्या मातांचाही सत्कार करण्यात आला. राणा दाम्पत्याने मातांना साडी भेट देऊन त्यांच्या त्यागाचे ऋण व्यक्त केले. या भावनिक दृश्यांनी सभागृहात उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नवनीत राणा यांनी सांगितले की, अमरावतीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणानंतर रोजगारासाठी इतर शहरांत फिरावे लागू नये म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्यातून अमरावतीत अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान केंद्र (आयटी पार्क) उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अमरावतीला केवळ शैक्षणिक नव्हे तर औद्योगिक केंद्र बनवण्याचा आमचा मानस आहे. आ. रवी राणा यांनी विद्यार्थ्यांना जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोणतीही ध्येय गाठता येतात, असा विश्वास दिला. या सोहळ्याला महापौर ललीत झोडपे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, उपमहापौर सचिन भेसडे, हरमन कंपनीचे संचालक हरप्रित मिन्हास आणि मोहरा कौर मिन्हास यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. निता खडसे, माजी नगरसेवक चंदुमल बिलदानी, विलास वाडेकर, हिंगणकर ताई, सुखदेवराव कावरे, माया धवने, माला खुरसुडे, आशिष गावंडे, ऋषिकेश जाधव, हर्षल रेवणे, नितीन अनासाने, चंदा लांडे, अर्चना तालन, अमजद बेग, वैभव लकरस, अनुप बिजवे, हर्षल निंभोरकर, अनिल राठी, मंगेश काळे, शंकर डोंगरे, सचिन होले, अमोल गोमासे, विरेंद्र उपाध्याय, भुषण दहिकर, वंदना जामनेकर, भारती गुडधे, मिथीलेश तिवारी, मुकुंद पंचारिया, भुषण पाटणे, अशोक पांडे, अतुल विधळे, मोहम्मद जमिर सर, सुरज उगले, रईसा परविन, निखील आकोटकर, अश्विन उके, प्रतिभा पंचवटे, विशा धाकडे, नाना सावरकर, सुचिता वनवे, अल्का इंगोले, महानंदा कातोरे, बोरकर ताई, सारिका अवघड, लक्ष्मण लाठेकर, निरज गवई, अर्जुन दाते, कुणाल केवतकर, सुखदेवराव कराळे, कांचन कडु, सुनिल तरडेजा, संगिता काळबांडे, अश्विनी झोड, अरुणा चचाणे, किर्ती लोरे, अश्विनी ढोके, सुनिता राऊत, मिनाक्षी कुरवाडे, जया तेलखडे, करण डेंढवाल, अमोल इंगळे, धर्मेंद्र मेहरे व असंख्य विद्यार्थी पालकवर्ग तसेच युवा स्वाभिमान पार्टी व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होत

संबंधित बातम्या

Back to top button