लोकशाहीचा उत्साह; पुदुच्चेरीत 90 टक्के मतदान
आसाम 85 टक्के पार, तर केरळनेही केला विक्रम

नवी दिल्ली/9 एप्रिल-आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथे गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार पुदुच्चेरीत सर्वाधिक 89.08 टक्के मतदान झाले, तर आसाममध्ये 85.04 टक्के आणि केरळमध्ये 77.38 टक्के मतदान नोंदवले गेले.
आसाममध्ये सर्व 126 विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 85.04 टक्के मतदान झाले. हे प्रमाण 2021 मधील 82.04 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. राज्यात भाजप-आघाडी (छऊअ) सलग तिसर्या कार्यकाळासाठी प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस सत्तेत पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे. मतदारसंघनिहाय पाहता, दलगाव येथे सर्वाधिक 94.57 टक्के मतदान झाले, तर अमरी येथे सर्वात कमी 70.40 टक्के मतदान झाले. या एकाच टप्प्यातील निवडणुकीत 722 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील 35 जिल्ह्यांतील 31,490 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान झाले. केरळमध्ये सर्व 140 जागांसाठी मतदान पार पडले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 77.38 टक्के मतदान झाले असून, हे 2021 मधील 74.06 टक्क्यांपेक्षा थोडे अधिक आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही केंद्रांवर उपस्थित असलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदानाची संधी देण्यात आली. अंतिम टक्केवारी सर्व मतदारांनी मतदान केल्यानंतर जाहीर होणार आहे. पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील 30 मतदारसंघांमध्येही मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 वाजता पूर्ण झाली. प्राथमिक अंदाजानुसार येथे 89 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. येथे छऊ- सत्तेत कायम राहण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस-नेतृत्वाखालील आघाडी -खछठउ आघाडीला सत्तेबाहेर करण्याच्या प्रयत्नात आहे. स्थानिक स्वायत्तता आणि प्रशासनातील मतभेद हे प्रचारातील प्रमुख मुद्दे ठरले.




