राज्यात चार महिन्यांत 254 कोटींचे ड्रग्ज जप्त

विधानसभेत गृहमंत्री फडणवीसांचे उत्तर

मुंबई/23 जून– राज्यात आणि विशेषतः मुंबई, पुणे, विदर्भासह अनेक भागांत वाढत्या अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यावरून पावसाळी अधिवेशनात आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ड्रग्जच्या मुद्द्यावर तब्बल 20 मिनिटे प्रदीर्घ आणि वादळी चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या ’झीरो टॉलरन्स’ धोरणाची घोषणा करत, राज्यात झालेल्या मोठ्या कारवायांचा, जप्त केलेल्या मुद्देमा लाचा आणि ’अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’च्या रण नीतीचा सविस्तर अहवाल सभागृहात मांडला. राज्यातील ड्रग्जविरोधी कारवायांची अधिकृत आकडेवारी सभागृहात सादर करण्यात आली. जानेवारी ते एप्रिल 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत अंमली पदार्थबाळगल्याप्रकरणी राज्यात एकूण 1,142 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1,626आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 254.53 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच, मागील वर्षभरात (2025मध्ये) -छढऋ आणि पोलिसांनी मिळून देशभरात तब्बल 523.17 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. केवळ तस्करच नव्हे, तर अंमली पदार्थ सेवन करण्याविरोधातही 3,199 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button