समृद्धीवर भीषण अपघात, पती-पत्नी ठार

ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर

बुलढाणा /23 जून: राज्यातील अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून कालच बदलापूरमधील भीषण अपघाताची घटना समोर आली होती. तर, समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना देखील नेहमीच समोर येत आहेत. आता, पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले असून दोन लहान मुले जखमी आहेत. यासह, कारचा चालक देखील गंभीर जखमीअसल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळ ही दुर्घटना घडली. समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळ भरधाव फॉर्च्यूनर कारने समोर धावणार्‍या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील पती-पत्नी जागीच ठार झाले असून कारमधील दोन चिमुरडे आणइ कार चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना जालना येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे आपल्या पत्नी गुलसीतान बी आणि कुटुंबासह नागपूरवरून संभाजीनगरच्या दिशेने जात होते. मात्र, समोर धावणार्‍या ट्रकला त्यांच्या फोर्च्यूनर कारने अनियंत्रित होऊन धडक दिली. या धडकेत डॉ.सय्यद आसिफसह पत्नी गुलसितान बी हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले असून त्यांच्या गाडीचा चालक आणि दोन लहान मुले जखमी झाले आहेत. हे कुटुंब नागपूरवरून संभाजीनगर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात होते.

संबंधित बातम्या

Back to top button