विजय वडेट्टीवारांविरोधात विधानसभेत हक्कभंग सादर

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी काँग्रेसचे गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजप आमदार योगेश सागर यांनी हा हक्कभंग प्रस्ताव सादर केला. राज्यातील 19 शेतकर्‍यांनी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा दावा करत भाजपच्या योगेश सागर यांनी शुक्रवारी (ता. 27 फेब्रुवारी) विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची सूचना दाखल केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रस्तावाबाबत आपण विचार करून निर्णय करू असे स्पष्ट केले.

Back to top button