प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढा

पुणे : राज्यात यापुढे महसूल विभागात प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याच्या प्रशा सनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तर महसूलमंत्री स्तरावरील सुरु असलेल्या 6 हजार खटल्यांपैकी सुमारे 2 हजार प्रकरणांवर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात आले आहेत. त्यासंदर्भात 1 हजार 200 आदेश पारित करण्यात आले आहेत. येत्या काळात महसूलमंत्री कार्यालयाकडील सर्व प्रलंबित खटले निकाली काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मराठा उद्योजक संघटनेच्या वतीने सिंचननगर येथे आयोजित इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. गायक अवधूत गुप्ते यांनी ही मुलाखत घेतली.

संबंधित बातम्या

Back to top button