अभिनंदन बँकेच्यावतीने आयएएस भाग्यश्री बानायत यांचा सत्कार

अमरावती/13 जून: अभिनंदन बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनेक सामाजिक कार्यांना मदतीचा हात देणारे सुदर्शन भाऊ गंगा यांचा डॉ. गोविंद क कासट मित्रमंडळीवर विशेष स्नेह आहे. डॉ. गोविंद कासटही त्यांच्या प्रत्येक कार्य क्षेत्रातील कार्याच्या वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांची कात्रणे फाईल रूपाने त्यांना भेट देत असतात. नुकताच अभिनंदन बँकेला आय ए एस भाग्यश्री बानायत यांनी बँकेच्या विनंतीवरून भेट दिली. बँकेचे अध्यक्ष एड. विजय बोथरा सुदर्शन गांग व संपूर्ण कार्यकारणीने त्यांचा शाल स्मृतीचिन्ह बँकेचे रोप्य महोत्सवी वर्षाची स्मरणिका इत्यादी प्रदान करून सत्कार केला. याप्रसंगी हजर असलेल्या डॉ. गोविंद कासट यांनी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते अभिनंदन बँकेच्या कार्याची वृत्तपत्रे कात्रणे मोठ्या संख्येत असलेली फाईल प्रदान करत बँकेचा गौरव केला. फाईलचा स्वीकार एड. विजय बोथरा सुदर्शन गांग यांनी केला. यावेळी यांच्यावर बँकेचे सीईओ शिवाजी देठे व मित्र मंडळातील बेघर निवारा केंद्राचे राजू बसवनाथे हजर होते.




