अमरावतीत काँग्रेस उमेदवार गायब झाल्याने खळबळ

स्वतःचे उमेदवार सांभाळा फडणविसांचा यशोमतीताईंना टोला, कोटींच्या व्यवहाराचे पूरावे असतील तर द्या, कारवाई करतो - मुख्यमंत्री

अमरावती/11जून– अमरावतीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर 20 कोटींच्या आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप करत लोकशाहीच्या हक्कावर गदा आल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसला स्वतःचे घर सांभाळण्याचा सल्ला दिला आहे. अमराव तीच्या निवडणुकीत वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांनी एकामागून एक गंभीर आरोप केले आहेत. गेल्या चार दिवसांपासून काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख नॉट रिचेबल असल्याने यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत.विरोधकांनी निवडणूक रिंगणातून हटवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अमरावतीतील राजकीय पारा कमालीचा चढला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भूमिका मांडत यशोमती ठाकूर यांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. विरोधक स्वतःचे उमेदवार सांभाळू शकत नसल्यामुळेच अशा प्रकारची निरर्थक विधाने करत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत सुरू असून जर 10 ते 15 कोटींच्या व्यवहाराचे काही पुरावे असतील तर ते सादर करावेत, सरकार त्वरित कठोर कारवाई करेल, असे स्पष्ट आव्हान त्यांनी दिले आहे. स्वतःच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडण्याचे काम काँग्रेस करत असल्याचे सांगत फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button