दारुड्या मुलाचा बापावर सळाखीने हल्ला

तिवसा / 22 जून: घरात दारु पिण्यासाठी मनाई केली म्हणून संतापलेल्या एका दारुड्या मुलाने आपल्या वडिलांवर लोखंडी सळाखीने प्रहार करुन त्यांना गंभीररीत्या जखमी केले. चांदुर रेल्वे शहरातील भगवंत चौकात ही घटना घडली. ज्ञानेश्वर प्रल्हाद टेंभे (65) असे जखमी पित्याचे नाव आहे.
शनिवारी रात्री ज्ञानेश्वर टेंभे हे जेवण करुन घरात झोपले होते. दरम्यान रात्री त्यांचा मुलगा अंकुश टेंभे हा मित्रासोबत घरी आला. घरातच दोघे दारु पित होते. ज्ञानेश्वर टेंभे यांनी अंकुशला घरात दारु पिउ नको, असे बजावले. त्यामुळे संतापलेल्या अंकुशने लोखंडी सळाखीने पित्यावर प्रहार केला. त्यात डोक्याला दुखापत होवून ज्ञानेश्वर टेंभे हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. चांदुर रेल्वे पोलिसांनी आरोपी अंकुश टेंभेवर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button