बकरी ईद रक्तदान कार्यक्रमाचे दुसरे वर्ष; 38 रक्तदात्यांचे रक्तदान
एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत शिबिर उत्साहात संपन्न

अमरावती /29 मे : ’प्राण्यांची कुर्बानी देण्यापेक्षा मानवाच्या आयुष्यासाठी रक्तदान करणे हीच खरी सेवा आहे’, हा सामाजिक संदेश देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अमरावती व बडनेरा शाखेने बकरी ईदनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीत बुधवारी आयोजित या शिबिरात 38 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे आगळेवेगळे उदाहरण समाजासमोर ठेवले.
शिबिराचे मुख्य आकर्षण होते ते ’वन-लेगड् वंडर ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे एव्हरेस्टवीर अशोक मुंडे. कठीण प्रसंगांवर मात करत एव्हरेस्ट सर करणार्या मुंडे यांच्या उपस्थितीने तरुणांमध्ये उत्साह संचारला होता. शिबिराची सुरुवात अशोक मुंडे, वैभव भोंडे, सचिन खोब्रागडे आणि रहमान शहा यांनी रक्तदान करून केली. मानवता, बंधुता आणि सामाजिक सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सलग दुसर्या वर्षी राबवण्यात आला. अनेक तरुणांनी या शिबिराद्वारे पहिल्यांदाच रक्तदान करत आपले कर्तव्य बजावले.
यावेळी रजिया सुलतान यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल, अशोक मुंडे यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल आणि जनसंपर्क अधिकारी मिलिंद तामडे यांच्या रक्तदान क्षेत्रातील कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्यांना संविधान आणि पर्यावरण जनजागृतीपर पुस्तकांचे वाटप करण्यात आले, तर पाहुण्यांना ’शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक भेट देण्यात आले. या उपक्रमासाठी अंनिस अमरावती, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, क्रांती नवनिर्माण राष्ट्रीय संघटना आणि संविधान जागर अभियान या संस्थांच्या पदाधिकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार व रक्तपेढी प्रमुख डॉ. आशिष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद तामडे, योगेश पानझाडे, संगीता गायधने, गजानन इंगळे व कर्मचार्यांनी मोलाचे सहकार्य केले.
रक्तदान शिबिराचा असा होता सहभाग-शिबिराचे यशस्वी नियोजन आणि संचालन सचिन खोब्रागडे, दिलीप लाडे, मंजू वासणीक आणि विजया कराळे यांनी केले. याशिवाय प्रफुल्ल मंधा, नरेंद्र धर्माळे, सुभाष गौरखेडे, विजय दवडे, अर्चना गावंडे, आशिष देशमुख, निखिल विल्हेकर, शुभम डाबेराव, जय कराळे, रवींद्र फुले, मनीष गणेशपुरे, अभिजित कणसे, मनिष पाटील, मयूर विघे, अनुप खोब्रागडे, निकिता खोब्रागडे, राखी ससाणे, कांचन बाझोरिया, मीनाक्षी इंगळे, श्वेता बारड, सीमा गणेश मोलाम, कुवे सर, मनिषा अनिल काळो आणि खलील शहा यांनी या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.




