विशेष शिबीराला कर्मचार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यापीठात आयोजित ‘आयुष्मान भारत कार्ड’

अमरावती /29 मे- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आरोग्य केंद्राच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या आयुष्मान भारत (पी.एम.जेएवाय) अंतर्गत ’आयुष्मान कार्ड’ विशेष शिबिराला विद्यापीठातील कर्मचा-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी कर्मचा-यांनी मोठएा प्रमाणात आपले ’आयुष्मान कार्ड’ काढले.
विद्यापीठ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह येथे 26 व 27 मे, 2026 रोजी सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरात विद्यापीठात कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी, जॉब वर्कर, एकत्रित वेतन धारक, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपले ’आयुष्मान कार्ड’ काढले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर पार पडले. सदर शिबीरामध्ये जवळपास 180 कर्मचा-यांनी नोंदणी केली. याप्रसंगी विद्यापीठ आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात तसेच डॉ. अंकुश मानकर, अली मन्सुर, स्वाती तायडे, रमेश लिखितकर, मनिषा दमाहे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागातील सचिन बाळापुरे यांनी परिश्रम घेतले.




