देशात इंग्रजी बोलणार्‍यांना लाज वाटेल

अमित शाह यांचं विधान

-भाषा वाद सुरु असताना टीकास्त्र
नवी दिल्ली/ 19 जून : देशातील काही राज्यात भाषेवरून वाद सुरू आहे, त्याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठं विधान केलंय. शाह यांनी इंग्रजी भाषेला महत्त्व देणार्‍या लोकांवर टीकास्त्र सोडलंय. आपल्या देशाच्या भाषा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. देशात जे लोक इंग्रजी बोलण्यास प्राधान्य देतात त्यांना पुढे लाज वाटेल असं म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर टीका केलीय.
अमित शाह दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय. या देशातील इंग्रजी भाषिकांना लवकरच लाज वाटेल, अशा समाजाची निर्मिती फार दूर नाहीये. माझा असा विश्वास आहे की आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीचे रत्न आहेत. आपल्या भारतीय भाषांशिवाय आपण खरे भारतीय होऊ शकत नाही., असं अमित शाह म्हणालेत.
मोदींनी अमृत काळासाठी पात पणची पायाभरणी केली आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करणे, गुलामगिरीच्या प्रत्येक खुणा दूर करणे, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि एकतेसाठी वचनबद्ध असणे आणि प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्याची भावना निर्माण करणे. हे पाच व्रत 130 कोटी भारतीयांचे संकल्प बनले आहेत. हेच कारण आहे की 2047 पर्यंत आपण अव्वल स्थानावर असू आणि या प्रवासात आपल्या भारतीय भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील, असे अमित शहा म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button