अभिनेता विजय निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली : दक्षिणेतील सुपर स्टार अभिनेता विजय याने स्थापन केलेला टीव्हीके पक्ष तामि ळनाडू विधान सभेची निवडणूक लढवणार असल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या टीव्हीकेने आज आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, टीव्हीकेचा प्रमुख असलेला अभिनेता विजय हा दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत विजय याच्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज टीव्हीके पक्षाने राज्यातील सर्व 234 जागांवरील आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. टीव्हीकेचा प्रमुख विजय हा स्वत: त्रिची पूर्व आणि चेन्नईमधील परम्बूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button