दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
बड्या नेत्याच्या वक्तव्याने विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुंबई/29 मार्च – महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांचं खंडन केलं होतं.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती. तसेच त्यासाठी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या, असा दावा करण्यात आला होता. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं. यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. पण आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य कारण ठरलं आहे. हा नेमका विषय काय आहे ते सविस्तर समजून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर ती अभिमानाची बाब असेल, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अजून वेळ निघून गेलेली नाही, असंही वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी व्हायला पाहिजेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा होते. तोच मान सुनेत्रा वहिनींना मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती.




