आषाढी निमित्त पंढरपूरसाठी विशेष ट्रेन
भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी रेल्वे सज्ज

विदर्भातून सुटणार विशेष रेल्वे फेर्या
अमरावती/25 जून- आषाढी एकादशीनिमित्त विदर्भातील वारकर्यांसाठी मध्य रेल्वेने अमरावती, नागपूर आणि खामगाव येथून पंढरपूरसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
21 व 24 जुलै रोजी दुपारी 2.40 वाजता गाडी संख्या 01119 नवा अमरावती-पंढरपूर स्पेशल रवाना होईल, जी दुसर्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पोहोचेल. परतीसाठी 22 व 25 जुलै रोजी गाडी संख्या 01120 पंढरपूर-नवा अमरावती स्पेशल संध्याकाळी 7.30 वाजता निघून पुढील दिवशी दुपारी 12.50 वाजता पोहोचेल. 18 डब्यांच्या या ट्रेनला बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोधवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबा असेल. नागपूर व खामगाववरून अतिरिक्त गाड्या-23 व 24 जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता गाडी संख्या 01205 नागपूर-मिरज स्पेशल रवाना होईल. परतीसाठी 24 व 25 जुलै रोजी गाडी संख्या 01206 मिरज-नागपूर स्पेशल दुपारी 12.55 वाजता सुटेल. तसेच 22 व 25 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता गाडी संख्या 01121 खामगाव-पंढरपूर विशेष ट्रेन धावेल. परतीसाठी 23 व 26 जुलै रोजी सकाळी 5 वाजता गाडी संख्या 01122 पंढरपूर-खामगाव ट्रेन रवाना होऊन त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचेल.




