उद्या संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त समतेचा वैचारिक व सांस्कृतिक महोत्सव
तुषार सूर्यवंशी यांच्या संविधानाच्या मूल्यांचे प्रबोधन प्रा.डॉ.रत्नाकर बनसोड यांचे जाहीर व्याख्यान

अमरावती /20 मार्च – संविधान प्रचार प्रसार संघ (बीकेव्हीपीएमबी एस)अमरावतीच्या पुढाकाराने भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त तसेच महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 वर्षांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमरावतीत समतेचा वैचारिक आणि सांस्कृतिक महोत्सव व घर घर संविधान मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,अमरावती येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विधी महाविद्यालय अमरावती येथील प्रा.डॉ.रत्नाकर बनसोड यांचे जाहीर व्याख्यान असून, ते भारतीय संविधानातील समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.तर सुप्रसिद्ध सत्य खंजिरीवादक तुषार सूर्यवंशी यांच्या सादरीकरणातून संविधानाच्या मूल्यांचे संगीतमय प्रबोधन होणार असून, कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगतही प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाला अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे,माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, समाज कल्याण विभागाच्या विभागीय उपायुक्त माया केदार, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर,बहुजन विकास विभागाचे उपसंचालक विजय साळवे, जात पडताळणी विभागाच्या उपायुक्त जया राऊत उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.याशिवाय गाडगे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सेवानिवृत्त अधिकारी रमेश कटके, एलआयसीचे एस. यु. फुलझेले, आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे, वीरपिता धनंजय गुळदेकर, तसेच वरिष्ठ नेते वसंतराव गवई,बी.आर. धाकडे,बार्टी च्या जिल्हा प्रकल्प अधिकारी अनिता गवई(राऊत) यांचीही उपस्थिती राहणार आहे.
समता, न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचा जागर करण्यासाठी आयोजित या महोत्सवाला अमरावतीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बिकेव्हिपीएमबीएस,संविधान प्रचार प्रसार संघ, अमरावतीचे कैलाश मोरे,समाधान वानखडे, जगदीश गोवर्धन, व्ही एम वानखडे, कपिल धवणे, मंगेश तायडे, साहिल लव्हाळे,किशोर सरदार,आशिष डोंगरे, दिगंबर गायकवाड, प्रीतम चक्रे, सुभाष कांबळे, संजय गजभिये, परमेश्वर वरठे, राजेश अंभोरे,कांचन हाडोळे,प्रतिभा वानखडे, आशा मेश्राम, अनिता जवंजाळ,लता गजभिये, मंदा गवई, बेबी मोहोड, सरला इंगळे, अर्चना थोरात, सुनीता शिरसा,सुवर्णा खांडेकर यांनी केले आहे.




