लग्न मंडपात, रसगुल्ला खाताना तरुणाचा मृत्यू

रांची/16 मार्च : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सगळ्याच राज्यांमध्ये लग्नसराई सुरु आहे. झारखंडमध्ये एका लग्न सोहळ्यात एका व्यक्तीचा विचित्र पद्धतीनं मृत्यू झाला. लग्नात जेवणावर ताव मारत असताना व्यक्तीनं अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे लग्न मांडवावर शोककळा पसरली. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी उपस्थितांनी बरीच धावपळ केली. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. जमशेदपूर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली. एमजीएम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मलियंता गावात ही हृदयद्रावक घटना घडली. शुक्रवारी रात्री उशिरा गावात लग्नाची धामधूम सुरु होती. लग्न लागल्यावर ग्रामस्थांनी, नातेवाईकांनी जेवणासाठी गर्दी केली. लग्नात जेवत असताना 41 वर्षी ललित सिंहच्या घशात रसगुल्ला अडकला. अन्य पाहुण्यांप्रमाणेच ललित सिंहदेखील जेवणाचा आस्वाद घेत होता. तेव्हा एक रसगुल्ला त्याच्या घशात अडकला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात अडचणी जाणवू लागल्या. त्याची प्रकृती वेगानं बिघडू लागली. काही वेळात त्यानं जीव सोडला.

संबंधित बातम्या

Back to top button