महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची टंचाई

वडेट्टीवारांकडून महत्त्वाची मागणी

मुंबई /11 मार्च : जगात सध्या अमेरिका, इस्रायल वि. इराण असे युद्धा सुरू आहे. या युद्धाला सुरू होऊन आता तीन आठवडे झाले आहेत. मात्र, इराण वि. अमेरिका, इराण वि. इस्रायल असे युद्ध सुरूच आहे. या युद्धाचे परिणाम आता इतर देशांवर होऊ लागले आहेत. या युद्धाची झळ भारताला आणि विशेषतः महाराष्ट्राला बसू लागली आहे. या युद्धामुळे महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची टंचाई भासू लागली आहे. सिलिंडरच्या तुटवड्यामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील गॅस सिलिंडर संपला आहे. याचबाबतचा मुद्दा आज बुधवारी (ता. 11 मार्च) काँग्रेसचे गटनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी सरकारने याबाबतचे निवेदन विधानसभेत द्यावे, अशी मागणी केली आहे.मुंबई बातम्या बुधवारी दुपारी 12 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित करत म्हटले की, काल रात्री सभागृह एक ते दीड वाजेपर्यंत चालले. रात्र खूप झाल्याने कॅन्टिन बंद होते. त्यांना तिथे त्यांना काहीही जेवणास मिळाले नाही.

संबंधित बातम्या

Back to top button