विद्यार्थ्यांचे प्रेम हीच चांगल्या शिक्षकाची पावती
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन

* डॉ. प्रसाद वाडेगावकर,डॉ.वर्षा वाडेगावकर यांना सेवानिवृत्तीप्रसंगी समारंभपूर्वक निरोप
अमरावती /27 फेब्रुवारी : चांगला शिक्षक कसा असतो, आणि सेवानिवृत्तीप्रसंगी विद्याथ्र्यांची मोठएा प्रमाणात असलेली उपस्थिती हेच प्रेम एका चांगल्या शिक्षकाची पावती असते, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अविनाश बोर्डे, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती माजी प्र-कुलगुरू व जीवतंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर, सौ. वर्षा वाडेगावकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. बारहाते प्रथमत: मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देवून पुढे म्हणाले, सध्या एआय चा काळ आहे व अशाही वेळी शिक्षक आपल्या विद्याथ्र्यांना अधिक प्रबळ करण्यासाठी प्रयत्नरत असतो. काळ कितीही बदलत असला तरी चांगला शिक्षक आपल्या विद्याथ्र्यांसाठी झटत असतो, असे सांगून त्यांनी उभयतांना उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी डॉ. प्रसाद वाडेगावकर, डॉ. वर्षा वाडेगावकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार केला, तर डॉ. वर्षा वाडेगावकर यांचा डॉ. स्वाती शेरेकर यांनी साडी-चोळी व कुंकवाचा करंडा देवून सत्कार केला. प्रमुख अतिथी डॉ. अविनाश बोर्डे म्हणाले, एकाच वेळी दोघेही सेवेतून निवृत्त होत आहे, हा विद्यापीठाच्या इतिहासातील पहिला योग असावा. वृत्तीची निवृत्ती होत नाही व ती होऊ नये. नावाप्रमाणेच डॉ. वाडेगावकर यांनी विद्याथ्र्यांना प्रसाद दिला आणि पुढेही ते विद्यापीठाला आणि विद्याथ्र्यांना देतील, असे सांगून त्यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासामध्ये एकाच दिवशी पती-पत्नी दोघेही एकाच संस्थेतून सेवानिवृत्त होण्याचा हा पहिलाच दुर्मिळ आणि आनंदाचा योग आहे. डॉ. वाडेगावकर सरांचे शिक्षण हिंदी माध्यमातून झाले असूनही, मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. सरांच्या निवृत्तीमुळे विद्याथ्र्यांसाठी पेला अर्धा रिकामा वाटू शकतो, पण त्यांनी दिलेली शिदोरी आणि प्रेरणा हा पेला सदैव भरलेला ठेवण्यास मदत करेल. सत्काराला उत्तर देतांना डॉ. प्रसाद वाडेगावकर म्हणाले, सेवेतून निवृत्त झालो तरी समाजाप्रति असलेली बांधिलकी कायम राहील.




