पत्रकारितेच्या विद्यार्थांनी अभ्यासले महात्मा गांधीचे जीवन कार्य
आयआयएमसी : सेवाग्रामचा अभ्यासदौरा

अमरावती /4 फेब्रुवारी : भारतीय जन संचार संस्थानच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्धा येथील सेवाग्राम ला भेट देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींची सेवाग्रामला येण्यामागचा उद्देश्य आणि त्यांचे जीवन कार्याशी संबंधित माहिती जाणून घेतली.
भारतीय जन संचार संस्थानच्या मराठी हिंदी व इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमच्या विद्यार्थ्यांनी मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिली. या दरम्यान विद्यार्थ्यांनी बापू कुटी, बा कुटी त्यांचे स्वयंपाकघर, गांधीजींचे रुग्णालय, त्यांचे कार्यालय, वापरात असलेले वस्तू, प्रार्थनागृह, सूत कातण्याचे चाक बघून आश्चर्य व्यक्त केला. यासोबतच परिसरातील सुती कापड तयार करणारे हातमाग केंद्राला देखील भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी सेवाग्राम आश्रमातील कर्मचारी माधुरी यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधींचे व्यक्तिमत्व, कार्य आणि आश्रमातील त्यांच्या कार्याबद्दल ऐतिहासिक माहिती दिली. महात्मा गांधी सेवाग्रामला काही वर्ष निवासाला होते. याठिकाणी त्यावेळचे अनेक राजकीय नेता, उद्योजक, आणि स्वातंत्र चळवळीत सहभागी लोक भेट देऊन महात्मा गांधींशी चर्चा करीत होते. त्यामुळे या स्थळाला ऐतहासिक महत्त्व प्राप्त झाले. या सर्व घटनाक्रमाची माहिती या अभ्यास दौर्यात विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी परिसरातील विविध उपक्रमाची माहिती देखील विद्यार्थ्यानी जाणून घेतली. या प्रसंगी, पदचिन्ह मासिकाचे संपादक, गांधीवादी विचारवंत डॉ. पंकज सिंग यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींचे विचार सांगून बापू कुटीचे महत्त्व अधोरेखित केले. सोबतच त्यांचे ’खादी एक विचार’ हे पुस्तक देखील भेट म्हणून दिले. अभ्यास भेटीत क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा समवेत डॉ. विनोद निताळे, डॉ. आदित्य मिश्रा, प्रा. प्रमोद गायकवाड, जयंत सोनोने आणि रोहन तायडे सहभागी होते.




