भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था असेल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली/25 जानेवारी – 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, हा उत्सव देशवासियांमध्ये राष्ट्रीय एकता आणि अभि मानाची भावना दृढ करतो. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, यावर्षी प्रजा सत्ताक दिना सोबतच वंदे मातरम् ला 150 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सवही साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा हा पवित्र दिवस आपल्याला देशाच्या भूतकाळावर, वर्तमानावर आणि भविष्यावर विचार करण्याची आणि समजून घेण्याची संधी देतो. काळानुसार आपल्या देशाची स्थिती बदलली आहे. भारत स्वतंत्र झाला आणि आपण स्वतः आपल्या देशाचे भविष्य ठरवणारे बनलो.त्या म्हणाल्या की, देशाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढला आहे. 57 कोटी जन-धन खात्यांपैकी 56 टक्के खाती महिलांची आहेत. 10 कोटींहून अधिक स्वयं-सहायता गट आहेत. खेळामध्ये आपल्या मुलींनी विक्रम केले आहेत.




