काँग्रेसच्या त्या दोन सदस्यांचे पक्षातुन निलंबन

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी काढले आदेश

वरुड । 13 जानेवारी – काँग्रेसच्या चिन्हावर निवडुन आलेल्या दोन नगरसेवकांनी भाजपाशी घरोबा केला. मात्र या बाबत वरिष्ठांना कोणतीही माहिती दिली नसल्याने पक्षशिस्तीचा भंग केल्याबाबत पक्षातुन निलंबित केल्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांनी आदेश पारित केले आहे. गेल्या तीन दिवसापुर्वी नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षांकडुन निवडणुक लढविलेले मो निसार मो शौकत व भाग्यश्री निलेश अधव दोघेही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडुन आले होते. त्यानंतर या दोघांनी गट स्थापन केला होता. मात्र त्यानंतर तो गट भाजपमध्ये विलीन करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार जिल्हा धिकार्‍यांनी दिलेल्या पत्रानुसार काँग्रेसचा गट भाजपात विलीन केला होता.
त्या संदर्भात पत्र सुद्धा निर्गमित केले होते. या सर्व सोपस्काराची जाणीव काँग्रेसच्या वरिष्टांना करुन देणे गरजेचे असतांना मो निसार व भाग्यश्री अधव यांनी ती दिली नसल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन देवते यांनी या दोघांनाही कारणे दाखवा, नोटीस बजावली होती. आज दि.13 ला या संदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांनी पक्षशिष्टीचा भंग केल्याबाबत काँग्रेस पक्षातुन निलंबित केल्याचे आदेश निर्गमित केले आहे. यात आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणुक लढवुन निवडुन आलेले आहात. आपण जिल्हा काँग्रेस कार्यालयास कोण तीही पुर्व कल्पना न देता किंवा अधिकृत माहिती न देता स्थानिक नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केले, असे वृत्त प्रसिद्धी माध्यमातुन प्रका शीत झाले असून ही बाब अत्यंत गंभीर असून काँग्रेस पक्षाच्या धोरणाना, तत्वन्ना, पक्ष शिस्तीला हरताळ फसणारी आहे. सदर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून शिस्तीचा भंग करणारी आहे. याची दाखल घेत आपणास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातुन सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे. अशा आशयाचे पत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे आता दोन्ही सदस्य भाजपमध्ये विलीन झाल्याने भाजपच्या सदस्य संख्येत वाढ झाली असून तिसर्‍या स्वीकृत सदस्यांचा मार्ग भाजपाने सुकर केल्याचे दिसुन येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button