अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटली!

भाजपचा अपक्षांना पाठिंबा जाहीर

* पालकमंत्री बावनकुळे यांच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ

अमरावती /10 जानेवारी : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अमरावतीमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षातील अंतर्गत धुसफूस अखेर युती तुटण्यापर्यंत पोहोचली आहे.
युतीच्या सुरुवातीपासूनच दोन्ही पक्षांत असलेला बेबनाव आता उघड झाला असून भाजपने युवा स्वाभिमानला सोडचिठ्ठी देत पाच महत्त्वाच्या जागांवर थेट अपक्ष उमेदवारांना आपले अधिकृत समर्थन जाहीर केले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चपराशीपुरा येथील सभेत हा धाडसी निर्णय जाहीर केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला आता एक नवी कलाटणी मिळाली आहे. युवा स्वाभिमानने युती धर्माचा भंग करत अतिरिक्त 35 उमेदवार रिंगणात उतरवल्याने भाजपने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या राजकीय भूकंपाचे पडसाद संपूर्ण शहरात उमटत असून भाजपने वडाळी प्रभागातील गौरी मंगेश सरवरे आणि अनिल सोनट्टके या अपक्षांना पाठिंबा देऊन राणांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

युती तुटण्यामागचे मुख्य कारण?

युवा स्वाभिमान पक्षाला भाजपने सन्मानाने सहा जागा दिल्या होत्या. मात्र, आमदार रवी राणा यांनी इतर 35 जागांवर आपले स्वतंत्र उमेदवार उभे करून भाजपला पेचात पाडले. या उमेदवारांना मागे घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची विनंती धुडकावून लावल्यामुळे, अखेर भाजपने आक्रमक पवित्रा घेत बडनेरा आणि अमरावतीच्या जागांवर अपक्षांना बळ देण्याचे निश्चित केले.

संबंधित बातम्या

Back to top button