निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो

मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादांना टोला

पिंपरी /10 जानेवारी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर प्रचंड विकास कामे केली आहेत. या कामामुळेच विरोधकांचा वैताग, त्रागा, रागराग आहे. त्यांच्याकडे सांगायला काही काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यामुळे निवडणुकीची चर्चा विकासावरुन वादावादी, प्रश्न-उत्तरात झाली.
मुंबईनंतर राज्याचं लक्ष पुण्यातील (र्झीपश) दोन्ही महापालिकांकडे लागलं असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लक्ष्य करत आपला भूमिका दाखवून दिली. त्यानंतर, भाजप नेत्यांनीही अजित पवारांना इशारा दिला आहे. मात्र, पिंपरी चिंचवडम महापालिका निवडणुकीतील प्रचारात येथील भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत, आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, जन्मत:च लंगोट घालणारे आम्ही आहोत, असे म्हणत चॅलेंज दिले होते. आता, पिंपरीतील महेश लांडगे अन् अजित पवार यांच्यातील वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. तसेच, शेरो शायरीच्या माध्यमातून अजित पवारांवर टीका करत महेश लांडगेंना सल्ला दिला.देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेच्या निमित्ताने पिंपरीत नाव न घेता अजित पवारांवर टीका केली. आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो. अनेकजण आरोप करत आहेत. मात्र मी सांगू इच्छितो की, असे म्हणत फडणवीसांनी शायरीतून टोला लगावला. आपलं काम बोलतंय, त्यामुळे हा वैताग आहे, हा त्रागा आहे, हा राग राग आहे. जरा समजून घ्या दादा, ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका. त्यांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांच्याकडे उत्तरं नाहीत. त्यामुळे त्यांना आरोप-प्रत्यारोपात ही निवडणूक गुंतवून ठेवायची आहे. पण, आपण विकासाच्या मुद्यावर बोलत रहायला हवं. म्हणजे, आरोप-प्रत्यारोप करत बसण्याची वेळ येणार नाही. महेश दादा तुम्ही टीका करु नका, फक्त आपण केलेल्या कामांची आठवण करुन द्या. म्हणजे, महेश दादा टीका करण्याची गरज पडणार नाही, असा सल्लाच फडणवीसांनी महेश लांडगेंना दिला.

संबंधित बातम्या

Back to top button