आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रचार सभा
दसरा मैदानावर होणार नेत्यांची मांदियाळी आणि शक्तीप्रदर्शन

अमरावती /7 जानेवारी : अमरावती महानगरपालिका निवड णुकीच्या रणसंग्रामात भारतीय जनता पार्टीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी 8 जानेवारी रोजी भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बडनेरा मार्गावरील दसरा मैदानावर सकाळी 11 वाजता पार पडणार्या या सभेच्या माध्यमातून भाजपा आपल्या विजयाचा संकल्प सोडणार आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे राज्यमंत्री पंकज भोयार राहणार असून, खा.डॉ. अनिल बोंडे आणि माजी खा. नवनीत राणा यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व प्रमुख आमदारांची व्यासपीठावर उपस्थिती लाभणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ होणारी ही पहिलीच मोठी सभा असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या राजकीय घडामोडीकडे लागले आहे. अमरावती शहराच्या विकासाचा अजेंडा आणि महापालिकेतील सत्तेचे समीकरण स्पष्ट करण्यासाठी भाजपाने या सभेचे जय्यत नियोजन केले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या या सभेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या सभेत प्रामुख्याने आ.डॉ. संजय कुटे, प्रवीण पोटे, डॉ. नितीन धांडे, आ. प्रतापदादा अडसड, आ. सुमित वानखडे, आ. राजेश बकाने, आ. राजेश वानखडे, आ. प्रवीण तायडे, आ. उमेश यावलकर आणि आम. केवलराम काळे यांसारखी तगडी राजकीय फळी उपस्थित राहणार आहे. लोकप्रतिनिधींच्या या मोठ्या उपस्थितीमुळे भाजपाने निवडणुकीपूर्वीच विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारे हे शक्तीप्रदर्शन शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरेल. भारतीय जनता पार्टी, अमरावती शहर (जिल्हा) शाखेच्या वतीने सभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, दसरा मैदानावर जनसमुदायाचा महासागर उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विकासाच्या मुद्द्यांवरून विरोधकांना घेरण्यासाठी आणि मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी या सभेत कोणती घोषणा केली जाते, याकडे राजकीय विश्लेषकांचे बारीक लक्ष आहे.
सभेचे मुख्य आकर्षण आणि वैशिष्ट्ये- अमरावतीच्या दसरा मैदानावर होणारी ही सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकाच व्यासपीठावर राज्याचे दिग्गज मंत्री, खासदार आणि डझनभर आमदारांची उपस्थिती हे भाजपाच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार आहे. या सभेच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्यासाठी पक्षाने विशेष रणनीती आखली आहे.
जुन्या राजकीय संघर्षाचा शहरात पुन्हा भडका-आहे. अमरावतीच्या सुसंस्कृतपणाला तडा देणार्या शक्तींशी आपण कधीही तडजोड केली नाही आणि भविष्यातही करणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संघर्षामुळे आगामी काळात निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार होणार आहे.
डॉ. देशमुखांचा सडेतोड प्रहार : गुन्हेगारीशी तडजोड नाही-मी जात किंवा धर्माचा नव्हे, तर केवळ सट्टा, अमली पदार्थ तस्कर आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा कट्टर शत्रू आहे. अशा समाजकंटकांना राजकीय आश्रय देऊन दहशत माजवू पाहणार्या नेत्यांशी मी कधीही तडजोड करणार नाही. अमरावती शहराची शांतता आणि सामान्य नागरिकांचे निर्भय जीवन हीच माझी प्राथमिकता असल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी ठणकावून सांगितले.




